बीड : पंकजा मुंडे यांची बदनामी करणारे आणि भापज पक्षाची बदनामी करणारे काही लोक आमच्याच पक्षात आहेत. पक्षाला बदनाम करणारा एक गटच पक्षात असल्याची जाहीर कबुली प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
भाजपा नेत्या पंकजा मुंडे आणि पक्षाच्या बदनामीबाबत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एक मोठे विधान केले आहे. पंकजा यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता,.
ज्यावरून पत्रकारांनी बावनकुळे यांना प्रश्न विचारला. या प्रश्नाला उत्तर देताना बावनकुळे म्हणाले, भाजपमध्ये पंकजा मुंडे आणि पक्षाला बदनाम करणारा एक गट आहे. तेच ही बदनामी करत आहेत.
पंकजा यांना बदनाम करणाऱ्यांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करणार असल्याचे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे. पंकजा मुंडे या आमच्या नेत्या आहेत. राज्यातले सर्व भाजपचे नेते पंकजाच्या पाठिशी आहेत, असे बानवकुळे यांनी म्हटले आहे.
मात्र काही लोक त्यांच्या बोलण्याचा वेगवेगळा अर्थ काढून व्हिडिओची मोडतोड करत आहेत आणि ते व्हायरल करत आहेत. त्यामुळं मी जिल्हाध्यक्षांना त्या माणसांना शोधून काढण्याचे आदेश दिले आहेत असे देखील बावनकुळे म्हणाले.

Post a Comment