बीड : आगामी काळातील मराठवाड्यातील सर्व निवडणुका महाविकास आघाडी जिंकणार असून दळभद्री भाजप सरकारच्या हाती काहीच मिळणार नाही, असे मतं राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी मांडले.
धनंजय मुंडे अपघातातून बरे झाले आहे. पण, त्यांना डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे. पण, मराठवाडा शिक्षक मतदार संघाचे उमेदवार विक्रम काळे यांच्या प्रचारार्थ परळी येथे आयोजित मेळाव्यात ऑनलाईन त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाने सर्वांना बळ मिळाले आहे.
मुंडे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाने एक उचल्या उमेदवार उचलून आणला आहे, हे फार दुर्दैव आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाला सात पिढ्या जरी गेल्या तरी विक्रम काळे यांच्या सारखा उमेदवार मिळणार नाही.
आगामी काळातील मराठवाड्यातील सर्व निवडणूक ही महाविकास आघाडी जिंकणार आणि या दळभद्री भाजप सरकारला हाती काहीच मिळणार नाही, असे विधान करत धनंजय मुंडे यांनी भाजपवर निशाणा साधला.
Post a Comment