प्रचार संपल्यानंतरही आरोप-प्रत्यारोप कसे होतात... आचारसंहिता भंग होत नाही का? कार्यकर्ते संभ्रमावस्थेत....

नगर : नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.  असे असतानाही नगर जिल्ह्यात आरोप-प्रत्यारोप कसे केले जाऊ शकतात, असा सवाल उपस्थित केला जात आहे.


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी प्रचार तोफा थंडावल्या आहेत. आता सोमवारी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यामुळे आता उमेदवार व त्यांचे समर्थक मतदारांच्या गाठीभेटी घेत आहेत.

आचारसंहितेचे पालन करणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. परंतु नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत आचारसंहिता भंग झालेली असल्याचे सगळ्याच पक्षांचे कार्यकर्ते बोलत आहेत. 

यावर आता प्रशासन काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कोणताही पक्षाचा कार्यकर्ता तक्रार करण्यास पुढे येत नाही. त्यामुळे आता प्रशासनाने पुढे येऊन तक्रार करुन कारवाई करणे गरजेचे आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post