सातारा : राजकीय मैदानात भाषणातून नेहमीच फटकेबाजी करून विरोधकांना आमदार रोहित पवार यांनी अनेकदा केलेली आहे. तशीच फटकेबाजी क्रिकेटच्या मैदानात करून विरोधकांना त्यांनी चूप बसवले आहे.
आमदार रोहित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी केएसडी शानबाग विद्यालयाला भेट दिली. याभेटी दरम्यान त्यांनी विद्यालयातील मुलांचा सत्कार केला. तसेच सत्कारानंतर त्यांना क्रिकेट खेळण्याचा आग्रह करण्यात आला.
या आग्रहामुळे रोहित पवारांनी आपली बॅटींग किती भारी आहे हे दाखवून दिले आहे. प्रत्येक बॉलवर जोरदार फटका मारत त्यांनी एक प्रकारे महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर झालेली निवड कशी योग्य आहे, हेच यातून दाखवून देत विरोधकांना उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

Post a Comment