नवी दिल्ली : 2024 च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महाविकासआघाडी एकत्र लढली तर महाराष्ट्रात भाजपला सगळ्यात मोठा धक्का बसण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.
इंडिया टुडे व सी-व्होटरने केलेल्या सर्व्हेचे हे आकडे भाजपची चिंता वाढवणारे आहेत. आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर महाराष्ट्रात एनडीएला (भाजप, शिंदे गट, आरपीआय) फक्त 14 जागा मिळतील, तर युपीएला तब्बल 34 जागा मिळतील, असा अंदाज इंडिया टुडे सी-व्होटरच्या सर्व्हेमध्ये व्यक्त करण्यात आला आहे.
महाराष्ट्रामध्ये भाजपला एवढा मोठा फटका बसेल असा अंदाज या सर्व्हेमध्ये व्यक्त केला गेला असला तरी केंद्रामध्ये पुन्हा मोदी सरकारच येईल, अस हा सर्वे सांगतो.
आज लोकसभेच्या निवडणुका झाल्या तर भाजपला बहुमतापेक्षा 10-12 जास्त जागा म्हणजेच 284 जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर काँग्रेसला 68 व इतरांना 191 जागा मिळण्याचा अंदाज आहे.
परंतु महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसणार आहे. राज्यातील घडामोडीमुळे हे होणार असल्याचे सांगितले जात आहे. राज्यात अनेक कामे शिंदे-फडणवीस सरकार करीत आहे. परंतु जनतामात्र नाराज असल्याचे या सर्वे वरून स्पष्ट होत आहे.

Post a Comment