विखे म्हणतात... पदवीधर निवडणुकीचे चित्र रात्रीतून बदलून टाकू....

नगर : एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेमध्ये आहे. ज्या माणसाचे नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि रात्रीतून चित्र बदलून टाकू, अशी प्रतिक्रिया खासदार सुजय विखेपाटील यांनी दिली.


नाशिक पदवीधर निवडणुकीत भाजपने अद्याप कोणत्याही उमेदवाराला पाठिंबा दर्शविलेला नाही. या निवडणुकीसाठी सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील या निवडणुकीच्या रिंगणात आहेत.

याबाबत भाजप खासदार सुजय विखे यांना विचारले असता त्यांनी प्रतिक्रिया दिली आहे. विखे म्हणाले की, हा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतात. देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे योग्य वेळी पक्षाचा निर्णय देतील. निवडणूक जवळ आली असली तरी एका रात्रीमध्ये निवडणूक बदलण्याची क्षमता नगर जिल्ह्याच्या प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्तेमध्ये आहे. 

ज्या माणसाचे नाव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून येईल, त्याला आम्ही पाठिंबा देऊ आणि रात्रीतून चित्र बदलून टाकू. अशी क्षमता प्रत्येक भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यामध्ये आहे याची अनुभूती सगळ्या जिल्ह्याला येईल, असे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post