वादळी वार्यासह पाऊस....

राहुरी :   वांबोरी  परिसरात मंगळवार (दि.२४) रोजी रात्री आठच्या सुमारास जोरदार वादळासह गारपीठ झाली. या वादळ व गारपिठीत गहू, हरभरा कांदा पिकाचे मोठे, हरभरा कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले.


सुमारे २० ते ३० मिनिट गारांसह मुसळधार पाऊस झाला. यामुळे गव्हाचे पिक भूईसपाट झाले. आधीच परतीच्या पावसाने या भागातील खरिपाच्या पिकांचे मोठे नुकसान झालेले असताना त्याची भरपाई शेतकर्याच्या पदरी पडलेली नाही. त्यातच आता पुन्हा रब्बी पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे.

शेतकरी आता आसमानी संकटापुढे हतबल झाला आहे. शासनाने झालेल्या गारपीठीचा पंचनामा करावा, अशी मागणी होत आहे.


नेवासा तालुक्यातही काही भागात वादळी वार्यासह पाऊस झाला आहे.  या पावसात अनेकांचे नुकसान झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post