मुंबई : पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात शिवशक्ती व भीमशक्ती एकत्र येणार आहेत. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आज शिवसेना व वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होणार आहे.
शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे एकत्र पत्रकार परिषद घेणार आहेत.
आज दुपारी एक वाजता दादरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे या दोन्ही नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद होणार आहे. ज्यामध्ये शिवसेना-वंचित युतीची अधिकृत घोषणा होणार आहे.
23 जानेवारीला बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना-वंचित बहुजन आघाडीच्या युतीची घोषणा होईल, असे शिवसेना नेते सुभाष देसाई म्हणाले आहेत.
दोन मोठे पक्ष एकत्र येत असताना मोठी प्रक्रिया असते, चर्चा करावी लागते. मनातून सगळं ठरलं आहे, असं सुभाष देसाई म्हणाले आहेत.

Post a Comment