मुंबई : येत्या काही दिवसांत राज्यात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या इशाऱ्यानुसार मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्याला पावसाचा तडाखा बसण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
नाशिक, धुळे, नंदुरबार, संभाजीनगरात तर, विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
अवकाळी पावसामुळे हातातोंडाशी आलेली रब्बी पिके धोक्यात येण्याची शक्यता असल्यामुळे आता शेतकरी वर्गही चिंतेत आला आहे. संपूर्ण परिस्थितीमध्ये मध्य महाराष्ट्रात गारवा कायम राहिल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यात पुढील 4 ते 5 दिवस थंडीचे असतील याबाबतची स्पष्ट माहितीसुद्धा देण्यात आली आहे.
Post a Comment