पुणे : नाशिक पदवीधर निवडणूक आणि सत्यजीत तांबे यांची उमेदवारी यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यावर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नाशिक पदवीधर मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराने बंडखोरी केली यापेक्षाही भाजपला उमेदवार मिळाला नाही. यावरून भाजपची ताकद कमी झाली हे स्पष्ट होत आहे.
भाजपने ज्या ज्या ठिकाणी उमेदवार दिले आहेत. त्यामध्ये शिंदे गटाला कुठेही न्याय मिळाला नाही याचाच अर्थ असा आहे की कोर्टाचा निकाल शिंदे सरकारच्या विरोधात जाईल.
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील सरकार पडेल ही चर्चा सुरु आहे. ती खरी होते काय अशी चर्चा सुरु झाली आहे. त्यातच आमदार पवार यांच्या वक्तव्याने राज्यात खळबळ उडाली आहे.

Post a Comment