खासदार सुजय विखे यांचा सत्यजित तांबे यांना सल्ला...

सोनई : भाजप खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना एक सल्ला दिला आहे.सत्यजीतला सल्ला आहे की शिवाजीराव कर्डिले यांना येऊन भेट. सगळं होऊन जाईल, असा मिश्किल सल्ला भाजप खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांनी सत्यजीत तांबे यांना दिला आहे. 


अहमदनगर जिल्ह्याच्या सोनई येथे माजी आमदार चंद्रशेखर घुले यांची कन्या व माजी मंत्री शंकरराव गडाख यांचे पुत्र यांचा विवाह सोहळा  पार पाडला. यावेळी सोनाईत आल्यानंतर सुजय विखे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

राज्यात तांबे यांच्या बंडामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. त्यात खासदार सुजय विखे यांच्या वक्तव्याने खळबळ उडाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post