अमरावती : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत अर्थसंकल्प सादर केला. इंग्रजीमधून बजेट सादर झाल्यामुळे प्रहार संघटनेचे आमदार बच्चू कडू नाराज झाले आहेत. राष्ट्रभाषेचा अवमान झाल्याचंही कडू म्हणाले.
हिंदी राष्ट्रभाषा असल्याने देशाचं बजेट हिंदीमधून सादर व्हायला पाहिजे होते. भाजप ही संस्कृती जोपासणारी पार्टी असल्याने पुढच्या अर्थसंकल्पीय बजेट हिंदीतून सादर व्हावे, अशी मागणी बच्चू कडू यांनी केली आहे. यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहीणार असल्याचंही बच्चू कडू यांनी म्हटले आहे. तुम्हाला हिंदी बोलता येत नसेल, तर दुसऱ्याकडून ते बजेट मांडा. नाहीतर माफी मागून इंग्रजी बोला, असे ते म्हणाले.
या अर्थसंकल्पावर आपण समाधानी आहोत, पण सरकारने गरिबीची व्याख्या निश्चित केली नाही. घरकूलमध्ये शहर-ग्रामीण तफावत आहे, त्यामध्ये सुधारणा केलेली नाही. शेतकरी, मजूर यांचा भाग सुटलेला आहे, असेही ते म्हणाले.
मोदी सरकारचा दुसऱ्या टर्ममधला हा शेवटचा पूर्ण अर्थसंकल्प होता, त्यामुळे या अर्थसंकल्पात मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा देण्यात आला आहे. इनकम टॅक्ससाठीची मर्यादा 5 लाखांवरून 7 लाखांवर नेण्यात आली आहे. आमदार बच्चू कडू यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे.
Post a Comment