सुप्रिया सुळे म्हणाल्या... देवेंद्र फडणवीस यांनी राजीनामा द्यावा...

पुणे ः राज्यात सातत्याने कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न समोर आले आहेत. दौंडमधली गुन्हेगारी, खून, पुण्यातील कोयता गँग, महिलांवर अत्याचार हे सातत्याने राज्यात होत आहे. राज्यात एवढं सगळं होत आहे.  हे गृहमंत्रालयाचे अपयश आहे. त्यामुळे जमत नसेल तर देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. हे माझं वैयक्तिक मत आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी फडणवीस यांना सुनावले आहे.


एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस ईडी म्हणलेले आवडते.  ईडी म्हणजे नक्की एकनाथ, देवेंद्र का आणखी काही माहीत नाही, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला. पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दिव्यांगांसाठी आणि वृद्धांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने आंदोलन केलं. यावेळी सुप्रिया सुळेही उपस्थित होत्या. त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांनी प्रकाश आंबेडकर यांच्या सभेवरही प्रतिक्रिया व्यक्त केली. प्रकाश आंबेडकर यांची सभा होतेय तर चांगलं आहे. संविधानाने सर्वांनाच सभा घेण्याचा अधिकार दिला आहे, असे त्या म्हणाल्या.

कसबा पोटनिवडणुकीच्या दरम्यान आचारसंहितेचा भंग झाला. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मला आश्चर्य वाटत नाही. कारण हे सरकार नियमाने चालत नाही. कायदे फक्त विरोधकांसाठी आहे. आचारसंहितेचा भंग करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी पक्ष केल असे  त्यांनी सांगितले. 

यावेळी त्यांनी केंद्रीय प्रतिक्रिया व्यक्त केली. महागाई आणि बेरोजगारीवर ठोस पावले उचलली पाहिजेत. कारण सरकारचे हे शेवटचे वर्ष आहे, असा टोला त्यांनी लगावला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post