नगर : शहरातील उड्डाणपुलावर दुचाकीच्या अपघातात नगरमधील लेबर कोर्टचे कामकाज पाहणारे प्रसिद्ध वकील ॲड.अनिरुद्ध रामचंद्र टाक यांचा पुलावरील वळणावर शुक्रवारी २० जानेवारी रोजी रात्री सव्वा आठच्या सुमारास अपघात झाला. त्यात त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
ॲड.अनिरुद्ध टाक हे आपल्या दुचाकीवरून जात होते. त्याच दरम्यान एक वाहन त्यांना धडक देऊन निघून गेले. त्यात त्यांना जबर मार लागला व त्यातच ते मृत्युमुखी पडले.
उड्डाणपुलावर अपघात होत होते. मात्र आज एकाचा बळी गेल्याने उड्डाणपुलाच्या कामावर नाराजी व्यक्त केली जात आहे. या पुलावरील कामात अनेक उणिवा आहेत. त्या तातडीेने दुरुस्त कराव्यात अशी मागणी होत आहे.

Post a Comment