अमर छत्तीसे
श्रीगोंदा : अहमदनगर जिल्हा कॄषी कर्मचारी सहकारी संस्थेच्या सार्वत्रिक निवडणूकीत चैतन्य पॅनल ची निवडणुक पार पडली या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल ची 10 वर्षाची सत्ता संपुष्टात आणून चैतन्य पॅनल ने परिवर्तन केले.
12 वर्षा पूर्वी माजी राज्य अध्यक्ष श्री सोमनाथ बाचकर यांनी तरुण अधिकारी कर्मचारी यांची मोट बांधून पतसंस्था निवडणूक लढवली आणि दोन टर्म यशस्वी सत्ता राखली. परंतु बदल ही काळाची गरज असते, एकहाती नियंत्रण त्याच त्याच जवळच्या सभासदांना संधी, नवीन सभासदांना विश्वासात न घेता ठराविक व्यक्ती ना संघटना ते सोसायटी प्रतिनिधित्व या कारणामुळे परावभ झाल्याचे मत सभासदांनी व्यक्त केले
चैतन्य पॅनल चे प्रमुख श्री अनिल कुमार शेजूळ यांनी जुन्या अनुभवी सभासदांना प्राधान्य देऊन नवीन तरुण सभासदांना सोबत घेऊन पॅनल ची मोर्चे बांधणी केली, त्यांना सुखदेव जमदाडे, अजिनाथ फंड, गणेश पवार, किरण घोडके, गणेश जगदाळे संतोष सुरवसे अश्या तरुण उमेदवारांची साथ मिळाली तर राजेश तुंबारे, एकनाथ चेमटे, राहुल क्षीरसागर, मोतीराम रहाणे, गंगाराम ढोले, विश्वास तोरडमल अश्या जुन्या अनुभवी उमेदवारांनी विजय खेचून आणला
महिलांना प्राधान्य देत पॅनल ने दोन महिला राखीव जागा सोबत एक महिला उमेदवारी जास्त देऊन तीन महिला उमेदवार निवडून आणले सामाजिक कार्यकर्ते व आदर्श कृषि सहाय्यक पुरस्कार प्राप्त श्री प्रतीक कांबळे यांची प्रभावी प्रचार यंत्रणा आणि आक्रमक भाषणे हा चैतन्य पॅनल च्या विजयाचा महत्वाचा दुवा ठरला.
Post a Comment