अमर छत्तीसे
श्रीगोंदा : तालुक्यातील लोणी व्यंकनाथ येथील रस्त्याच्या कामाचा आज खासदार डॉ सुजय विखे पाटील व आमदार बबनराव पाचपुते यांच्या उपस्थितीत शुभारंभ होत असताना गावातील कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीच्या नेत्यांची उपस्थिती कार्यकर्त्यांना खटकली आहे.
खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीत आज तालुक्यात विविध कामांचा शुभारंभ करण्यात आला. आजच्या दौर्यात सुरुवातीला लोणी व्यंकनाथ येथील रस्त्याच्या कामाचा शुभारंभ होता या कार्यक्रमात आमदार बबनराव पाचपुते यांच्यासह स्थानिक भाजप चे कार्यकर्ते उपस्थित होते.
पण याच कार्यक्रमात राष्ट्रवादी च्या नेत्याची उपस्थिती स्थानिक कार्यकर्त्यांना खटकली यात कार्यकर्त्यांने त्या नेत्याच्या उपस्थिती वर आक्षेप घेतला. यामुळे कार्यक्रमातील गोंधळ चांगलाच वाढला त्या नेत्याची उपस्थिती वादाचा मुद्दा ठरला होता. त्या नेत्याचा चांगलाच पाण उतारा झाला असल्यामुळे याच कार्यक्रमाची चर्चा तालुक्यात होती.
Post a Comment