लंके म्हणतात... अजित पवार यांना मुख्यमंत्री करण्यासाठी कामाला लागा.....

नगर : अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे कामाला लागा, असे विधान राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी अजित पवारांसमोरच केले आहे.


राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी नुकतेच कार्यकर्त्यांना उद्देशून एक जाहीर विधान केले होते. यामध्ये त्यांनी म्हटले की, आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल आपल्यालाला आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. 

त्यामुळे कामाला लागा विशेष म्हणजे अजित पवारांसमोरच त्यांनी हे विधान केले होते. लंकेबरोबरच राष्ट्रवादीच्या इतरही अनेक आमदारांची व कार्यकर्त्यांनी अशीच इच्छा असल्याने लंके यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.


या विधानामुळे राष्ट्रवादीत एक चैतन्य निर्माण झाले आहे. परंतु राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.आगामी विधानसभा निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post