अजित पवार यांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत शरद पवार म्हणाले....

नाशिक : कोणाला काहीही आवडेल पण तुमची तेवढी संख्या असली पाहिजे ना? जर आम्ही क्रमांक एकचा पक्ष असतो तर आमच्या सर्व सहकाऱ्यांना विश्वासात घेऊन आम्ही काही निर्णय घेतले असते. पण आज आमच्याकडे शक्ती नाही, संख्या नाही. त्यामुळे त्यावर भाष्य करणे मला योग्य वाटत नाही, असे 


अजित पवारांना मुख्यमंत्री झालेले पहायला आवडेल, अशी इच्छा राष्ट्रवादीच्या काही आमदारांनी नुकतीच व्यक्त केली होती. त्यामुळे आता राज्याच्या राजकारणात या चर्चेला तोंड फुटले आहे. दरम्यान, यावर शरद पवारांनीही भाष्य केले आहे. नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नीलेश लंके यांनी नुकतेच कार्यकर्त्यांना उद्देशून एक जाहीर विधान केले होते. यामध्ये त्यांनी म्हटलं की, आता पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच असेल आपल्यालाला आता अजितदादांना मुख्यमंत्री करायचे आहे. 

त्यामुळे कामाला लागा विशेष म्हणजे अजित पवारांसमोरच त्यांनी हे विधान केले होते. लंकेबरोबरच राष्ट्रवादीच्या इतरही अनेक आमदारांची व कार्यकर्त्यांनी अशीच इच्छा असल्याने लंके यांच्या या विधानाची राज्याच्या राजकारणात चर्चा सुरु झाली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post