नगर ः नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत सध्या ज्या राजकीय हालाचाली झाल्या. तशाच हालचाली आता आगामी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत होणार आहे. मात्र यावेळी भाजपात जाणाऱ्यांचा ओघ जास्त राहिल, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत जशा नाट्यमय घडामोडी घडल्या. तशाच प्रकारच्या हालचाली आगामी पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीत होणार आहेत. जिल्ह्यातील एका तालुक्यात सख्या चुलत भावांमध्ये लढत होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच एका तालुक्यात चुलते व पुतण्या यांच्यात नेमके जिल्हा परिषदेला कोणी उभे राहयचे यावरून संघर्ष होण्याची शक्यात आहे.
या घरगुती भांडणाचा लाभ मात्र इतर पक्ष घेण्याची शक्यता आहे. एका गटाला आपल्या बाजुला घेऊन आगामी निवडणुका लढविल्या जाण्याची शक्यता आहे. पदवीधऱ निवडणुकीत जे झाले ते पुन्हा घडू नये, यासाठी आता सर्वच नेत्यांनी कंबर कसली असली तरी आता कुटुंबातील एकमेकांची नाराजी कशी दूर करायची असा प्रश्न सर्वांपुढे राहणार आहे. मात्र जिल्ह्यात सख्ये चुलत भावातील लढत व चुलते व पुण्यातील निवडणुकीत उतरण्यावरून संघर्ष होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यावर सध्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरु आहे.
एका तालुक्यात आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन आता महिलांना निवडणुकीच्या आखाड्यात उतरविले जाणार आहे. ऐनवेळी जर विरोधी गटाकडून महिला उमेदवार निवडणुकीच्या आखाड्यात उतरविला तर आपल्या घरातील महिला निवडणुकीत उतरविता यावी, यासाठी आता नियोजन करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत या तालुक्यातील प्रत्येक नेत्याच्या घरातील महिला उमेदवार राहणार आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेची निवडणूक चांगलीच रंगदार होणार आहे. प्रत्येक गटासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची राहणार आहे.
Post a Comment