बुलडाणा : राजकीय भूकंप नक्की होईल, मात्र तो असा की काँग्रेस व राष्ट्रवादीचे काही आमदार शिंदे गट व भाजपमध्ये सामील झालेले दिसतील, असे खासदार प्रतापराव जाधव यांनी आमदार केले आहे. खासदार प्रतापराव जाधव यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलं आहे.
निवडणूक आयोगाने मोठा निर्णय दिला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयामुळे खरी शिवसेना कोणाची यावर शिक्कामोर्तब झाले आहे. पक्षाचं नाव व धनुष्यबाण चिन्ह हे शिंदे गटाला मिळाल्याने शिंदे गटात उत्साहाच वातावरण आहे.
पक्षाचे नाव व चिन्ह मिळाल्यानंतर आता शिदे गटाने आपला मोर्चा हा काँग्रेस व राष्ट्रवादीकडे वळवल्याचं दिसून येत आहे. राज्यात नक्कीच राजकीय भूकंप होईल, मात्र राष्ट्रवादी व काँग्रेसचे काही आमदार भाजप व शिंदे गटात दिसतील असा मोठा गौप्यस्फोट शिंदे गटाचे खासदार प्रतापराव जाधव यांनी केला आहे.
ठाण्यातील ठाकरे गटाच्या जवळपास सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मात्र आता शिंदे गटाकडून ठाण्यात राष्ट्रवादीला धक्का देण्याचं काम सुरू आहे. ठाण्यातील अनेक नगरसेवक हे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याचं बोलले जात आहे. त्यामुळे आता शिंदे गटाने आपला मोर्चा हा काँग्रेस, राष्ट्रवादीकडे वळवला आहे का असा प्रश्न निर्माण होत आहे.
राज्यात राजकीय भूकंप होईल असे राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार बोलले होते. त्याला त्यांनी हे उत्तर दिले आहे.
भूकंपापूर्वी प्राणी आणि पक्षांच वर्तन बदलत असते. एकप्रकारे ती भूकंपाची पूर्वसूचनाच असते. असंच एक वेगळ्या प्रकारचे माझे आजचे निरीक्षण आहे. सत्ताधारी पक्षातील अनेक सहकारी आमदारांची कामानिमित्त मुंबईत असताना भेट झाली असता काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. या आमदारांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता आणि बॉडी लँग्वेज पडलेली होती, असा दावा आमदार रोहित पवारांनी ट्वीटमधून केला आहे.
Post a Comment