मुंबई : शिंदे गट शिवसेनाभवनही ताब्यात घेणार याची चर्चा सुरु झाली आहे. त्यावर आता काय हालचाल होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयाने उद्धव ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. शिवसेना व धनुष्यबाण शिंदे गटाला देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोगाने दिला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या हातातून शिवसेना व धनुष्यबाण निसटले आहे.
आता शिवसेना भवन कोणाचं? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ठाकरे-शिंदे गटात हमरीतुमरी झाली नाही, असा एक दिवस सहा महिन्यात गेला नाही. मुंबई महापालिकेतील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटानं दावा ठोकला व आता शिंदे शिवसेनाभवन ताब्यात घेणार या चर्चांना उधाण आले आहे.
शिवसेनेने अनेक बंड पचवली. बाहेरच्यांची आणि घरच्यांचीही पण कधी शिवसेनेच्या अस्तित्वाला धोका पोहचला नाही. शिंदेंच्या बंडानंतर मात्र शिवसेनेच्या अस्तिवालाच नख लागले. त्यानंतर पहिल्यांदा तीस वर्षांपासून शिवसेनेची ओळख असलेलं धनुष्यबाण चिन्हं गोठवलं गेलं, सोबत शिवसेना हे पक्षाचं नावही गोठवलं गेलं.
शिवसेना आमचीच, आम्हीच खरी शिवसेना असा दावा शिंदे गट बंडाच्या पहिल्या दिवसापासून करतोय. त्यात आता शिंदे गट शिवसेनाभवनही ताब्यात घेणार याची चर्चा सुरु झाली आहे.
कुणाच्या स्वप्नातही आल्या नसतील अशा घटना शिंदेंच्या बंडानंतर घडल्या. त्यात शिवसैनिकांसाठी मंदिरासमान असणारं शिवसेना भवन शिंदे गट ताब्यात घेईल, असा दावा करण्यात आला आहे.
Post a Comment