गहाण ठेवलेे धनुष्यबाण आम्ही सोडवले...

मुंबई : शिवसेनेचा धनुष्यबाण तुम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे गहाण ठेवलं होते, तो आम्ही सोडवला, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.


केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना हे नाव व धनुष्यबाण हे पक्षचिन्ह शिंदे गटाला देण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर आता राजकीय वर्तुळात हालचालींना वेग आला आहे. आयोगाच्या निर्णयानंतर उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले आहे.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, आजचा विजय हा बहुमताचा विजय आहे. 2019 साली तुम्ही बाळासाहेबांचे विचार गहाण ठेवले. आम्ही चोर तुम्ही साव, आत्मपरिक्षण करा, असेही ते म्हणाले आहेत. लोकशाहीत बहुमताला महत्त्व आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय लोकशाहीच्या बाजूने आहे. निवडणूक आयोगाबाबत उद्धव ठाकरे दुपट्टी असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे.

शिंदे म्हणाले की, तुम्ही बाळासाहेबांचे विचार नासवत होता. आम्ही त्यांचे विचार रुजवण्याचे काम करतोय, असंही एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले आहेत.

दरम्यान, धनुष्यबाणाची चोरी शिंदे गटाला पचणार नाही. येत्या दोन महिन्यात निवडणुका जाहीर होती, असं भाकीत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केलंय. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध ठाकरे गट सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याची घोषणा देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post