शिक्षकांचे काम दीपस्तंभासारखे ....


नेवासा : समाज घडवणेसाठी शिक्षक हा महत्त्वपूर्ण घटक असून शिक्षकांचे काम विदयार्थ्यांसाठी दिपस्तंभासारखे असल्याचे गौरवोदगार जिल्हा परिषद प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी तथा स्काऊट गाईड विभागाचे मुख्य आयुक्त भास्कर पाटील यांनी काढले.

त्रिमूर्ती शैक्षणिक संकुलात अहमदनगर स्काऊट गाईड विभाग व जिल्हा परिषद अहमदनगर यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित निवासी प्रशिक्षण शिबिरातील प्रशिक्षणार्थ्यांना संबोधित करताना त्यांनी हे उद्गार काढले. 


पाटील म्हणाले की, स्काऊट गाईड प्रशिक्षणातून स्वंयशिस्त तयार होते. चेथून प्रशिक्षण घेतल्यानंतर प्रत्येकाने आपापल्या शाळेत विदयार्थ्यांना स्काऊट गाईड चे धडे प्रामाणिकपणे दयावेत, असेही आवाहन केले.


यावेळी गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, त्रिमूर्ति संकुलाचे प्राचार्य सोपान काळे, शिबिर संचालक दिलीप नेवसे, गाईड कॅप्टन शिबिर प्रमुख अनिता शिंदे, कबमास्टर प्रमुख वसंतराव माने, फलॅक लिडर खुर्शिद शेख, जिल्हा संघटक जी.जे. भोर, सोनाक्षी तेलंगे, आदि मान्यवर उपस्थित होते.

प्राचार्य सोपान काळे , जिल्हा संघटक जी.जे. भोर यांनी मनोगत व्यक्त केले, सूत्रसंचालन भास्कर नरसाळे यांनी तर आभार सोनाली तेलंगे यांनी मानले.


जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारणेसाठी जिल्हास्तरावरून वस्तुनिष्ठ शाळा भेटीचे नियोजन केले असून, त्यादवारे विदयार्थी गुणवत्ता वाढीसाठी मास्टर प्लॅन तयार असून त्याची अमंलबजावणी सुरू असल्याचे शिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post