सत्यजित तांबे म्हणतात...देवेंद्र फडणवीस मोठ्या भावा सारखे...


नाशिक : माझ्या पुस्तक प्रकाशनाला मी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्यासह अजितदादांनाही आमंत्रित केले होते. तेव्हा देवेंद्रजी बोलले त्यावरून चर्चा झाली. सभागृहातदेखील दाद मिळाली. आमची भावना त्यांनी बोलून दाखवली. ते मला मोठ्या भावासारखे आहेत, असे सूचक विधान आमदार सत्यजीत तांबे यांनी केले.


नाशिक येथे आमदार सत्यजित तांबे पत्रकार परिषदेत बोलत होते.  तांबे म्हणाले की, पक्षाला आणि एचके पाटील साहेबांना आम्ही हे कळवलं. आम्ही त्यांच्या संपर्कात होतो, कारण हे तिकीट दिल्लीतून मिळतात, त्यांनी सांगितलं कोरा एबी फॉर्म पाठवला आहे. 

अर्ज भरण्याच्या दोन दिवस आधी 2 जानेवारीला एबी फॉर्म पक्षाकडे मागितला. त्यांनी नागपूरला बोलावलं, तिथे माझा माणूस गेला. 10 तास त्या माणसाला बसावं लागलं, तेव्हा त्याला नाना पटोले यांनी फॉर्म दिला. 11 तारखेला तो फॉर्म घेऊन पोहोचलो. 

बंद पाकीट फोडलं तेव्हा दोन्ही एबी फॉर्म पाठवले ते नाशिकचे नव्हते. एक औरंगाबाद आणि दुसरा नागपूर मतदारसंघाचा एबी फॉर्म आम्हाला दिला,’ असा गंभीर आरोप सत्यजीत तांबे यांनी केला आहे.

भाजप कार्यकर्त्यांनी मला पाठबळ दिले. राष्ट्रवादी, शिवसेना तसेच काँग्रेसच्या नेत्यांनी, कार्यकर्त्यांनी निवडणुकीत मला मदत केली. भविष्यातही मी अपक्षच राहिल असेही त्यांनी स्पष्ट केले.

मी या मतदारसंघातून अपक्ष निवडून आलो आहे, त्यामुळे यापुढेही मी अपक्षच राहणार असं सत्यजीत तांबे यांनी सांगितलं. मी काँग्रेस परिवारामध्ये वाढलो आहे, पण मला पक्षांतर्गत मत मांडण्याची संधी न देता माझ्याविरोधात नेहमी वक्तव्य केली गेली, त्यामुळे माझ्याकडे पर्याय राहिला नाही असं सत्यजीत तांबे म्हणाले. 



0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post