गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेल्या भाजपच्या नेते पंकजा मुंडे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज एकाच कारने एकत्र आल्याचे पाहण्यास मिळाले. त्यामुळे पंकजा मुंडे यांची नाराजी दूर झाली का, अशी चर्चा रंगली आहे.
काही दिवसांपूर्वी पंकजा मुंडे व फडणवीस यांच्यामध्ये दरी निर्माण झाली होती .बीडमध्ये फडणवीस यांच्या दोन्ही कार्यक्रमाला पंकजा मुंडे यांनी गैरहजेरी लावली होती. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. त्यानंतर पंकजा मुंडे या दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्या बैठकीला एकत्र दिसल्या होत्या. त्यानंतर आज कार्यकारी बैठकीला एकाच कारने फडणवीस आणि पंकजा मुंडे आल्यामुळे सगळ्यांच्या भुवय्या उंचावल्या.
दरम्यान, आजच्या या बैठकीत भाजप आणि शिंदे गटाचा राज्यात 200 चा नारा असणार आहे. लोकसभेसाठी मिशन 45 तर विधानसभेसाठी मिशन 200 असा नारा आजच्या कार्यकारणीत बैठकीत देणार आहे. या कार्यकारिणी बैठकीत लोकसभा-विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहे.
शुक्रवारी या बैठकीत लोकसभा प्रवास, स्वावलंबी भारत, मन की बात, एक भारत श्रेष्ठ भारत, फ्रेंड्स ऑफ बिजेपी, धन्यवाद मोदीजी, मतदार नोंदणी, डेटा व्यवस्थापन, युवा वॉरीयर्स, सोशल मीडिया आणि त्याचा वापर व विधानसभा प्रवास या विषयांचा आढावा घेण्यात आला.
Post a Comment