कामाचा हिशोब दिला तर वाचताही येणार नाही... प्राजक्त तनपुरे यांची टीका...

पाथर्डी :  कार्यक्रमात काहींनी माझ्यावर टीका करत मिरी कुठे आहे हे यांना माहित नाही म्हणाले. पण त्यांनी फक्त आता बुर्हानगर मध्ये लक्ष घालावे. आज कार्यक्रम ठरल्याने काल आचारसहिंता असतानाही घाईघाईत कार्यक्रम घेतला. मी काय काम केले याचा ते हिशोब मागतात मात्र मी हिशोब दिला तर तुम्हाला तो वाचता सुद्धा येणार नाही, अशी टीका माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांचा नामोल्लेख टाळून टीका केली.


पाथर्डी तालुक्यात तिसगाव व इतर ३९ गावांकरिता तिसगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या कार्यासाठी महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रशासकीय मान्यता मिळाली होती. सुमारे १५४ कोटी रुपयांच्या या योजनेचा भूमिपूजन सोहळा आज तत्कालीन उपमुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या वेळी आमदार निलेश लंके, माजी आमदार चंद्रशेखर घुले, प्रताप ढाकणे, डॉ. उषाताई तनपुरे, राजेंद्र फाळके, राजेंद्र दळवी, क्षितिज घुले, शिवशंकर राजळे, चंद्रकांत म्हस्के, काशिनाथ पाटील लवांडे, भगवान दराडे, इलियास शेख, मुनीफा शेख, संगीता गारुडकर, नासिर शेख, बंडू बोरुडे, सीताराम बोरुडे, चांद मणियार आदी उपस्थित होते.

योजनेला अजित पवार यांनी प्रशासकीय मान्यता दिली असल्याने या योजनेचे श्रेय हे पवार यांचे असल्याचे ते म्हणाले. प्रास्ताविक शिवशंकर राजळे यांनी तर सूत्रसंचालन उद्धव काळापहाड केले.  अमोल वाघ यांनी आभार मानले.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post