राम शिंदे म्हणतात.... अजित पवार बंडखोरी करणार कोणाला सांगितल...

नगर  : अजित पवार हे सांगतात की, एकनाथ शिंदे हे बंडखोरी करणार आहेत. हे मी उद्धव ठाकरे यांना सांगितले, मात्र अजित पवार बंडखोरी करणार आहेत हे अजित पवारांनी कोणाला सांगितलं? असा खोचक सवाल करत माजी मंत्री राम शिंदे यांनी अजित पवार यांना टोला लगावला आहे..


नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमुळे नगर जिल्ह्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. सत्यजीत तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसवर पलटवार केला. त्यांच्या या भूमिकेनंतर राम शिंदेंनी पत्रकारांशी संवाद साधला.

राम शिंदे म्हणाले की, सुधीर तांबे यांनी सत्यजीत तांबे हे निवडून आल्याबरोबर प्रतिक्रिया दिली होती की आम्ही पुन्हा काँग्रेसमध्ये जाणार नाही. शिवाय त्यांनी भारतीय जनता पार्टीचे आभार देखील मानले होते, त्यांनी काँग्रेस पक्ष सोडले नाही. यापेक्षा काँग्रेसने त्यांना सोडलं हे या ठिकाणी अधोरेखित करणे अधिक महत्त्वाचा आहे, असेते म्हणाले.

राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काय करू शकतात हे उभ्या राज्याने पाहिलं आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांना जे आव्हान दिले त्यावरून त्यांनी आता तरी बालिशपणा सोडला पाहिजे. 

आपण आव्हान कोणाला देतोय, या देशात आणि राज्यात जे कोणीही घडवू शकले नाही, ते एकनाथ शिंदे यांनी घडवलं आणि परिवर्तन केलं. त्यामुळे आता तरी आदित्य ठाकरे यांनी हे बालिश विचार मांडण्याचे थांबवावं, असा सल्ला त्यांना दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post