नगर : नगर जिल्हा लोकसंख्या व आकारमानाने मोठा आहे. त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येतो. जनतेची कामे वेळेवर होत नाहीत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याचे विभाजन व्हावे ही आपली पूर्वीही भूमिका होती आणि आजही आहे आणि त्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील असे प्रतिपादन आमदार राम शिंदे यांनी केले.
आमदार राम शिंदे यांची भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती झाल्याबद्दल जिल्हा भाजपा च्या वतीने त्यांचा बाजार समिती मधील शेतकरी भवनमध्ये सत्कार आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, माजी आमदार शिवाजीराव कर्डीले, जिल्हा परिषद सदस्य प्रतिभा पाचपुते, मिलिंद गंधे,अश्विनी थोरात, सुजित झावरे, सुरेश सुंभे,मनोज कोकाटे, अभिलाष घिगे,विलास शिंदे,रेवणनाथ चोभे,संतोष म्हस्के, दिलीप भालसिंग, दीपक कार्ले,भाऊसाहेब बोठे, अशोक झरेकर आदींसह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी माजी आमदार कर्डिले यांनी जिल्हा विभाजनाचा मुद्दा मांडला. आमदार शिंदे म्हणाले की, मी पालकमंत्री असल्यापासून जिल्हा विभाजनाची भूमिका घेतलेली आहे आणि आजही त्या भूमिकेवर कायम आहे. चार- चार आमदार असणाऱ्या कोकणातील जिल्ह्यांना स्वतंत्र अधिकारी आहेत.
पण अहमदनगर जिल्हा लोकसंख्या आणि आकाराने सर्वात मोठा आहे. जिल्ह्यात दोन खासदार आहेत. त्यामुळे प्रशासनावर कामाचा फार मोठा ताण येतो परिणामी जनतेची कामे वेळेवर होत नाहीत.त्यामुळे जिल्हा विभाजन झालेच पाहिजे.याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पण अनुकूल आहेत.
विभाजनासाठी सर्व प्रयत्न केले जातील. 27 फेब्रुवारी पूर्वी मंत्रिमंडळ विस्तार होणारच आहे. जिल्ह्याला प्रत्येक मंत्रिमंडळ मध्ये आजवर 3 मंत्री पदे मिळत आली आहेत. तीन नाही तर किमान दोन तरी मंत्री जिल्ह्याला मिळतील यासाठी आपण प्रयत्न करू.
Post a Comment