घनश्याम शेलार यांचे कार्यकर्ते जोमात...

अमर छत्तीसे

नगर : श्रीगोंदा विधानसभा मतदार संघात घनश्याम शेलार यांना आमदार करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी पूर्ण प्रयत्न केले जातील, असे प्रतिपादन शिवसेनेच्या ठाकरे गटाचे दक्षिण जिल्हा प्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांनी केले. या त्यांच्या वक्तव्याने शेलार यांचे कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारला असून आता अण्णांना आमदार करून स्वस्थ बसायचं असा निर्धार काहीजणएकमेकांजवळ व्यक्त करीत आहेत.


चिचोंडी पाटील येथील सरपंच, उपसरपंच पदग्रहन प्रसंगी ते बोलत होते. चिचोंडी पाटील (ता. नगर) गावच्या सरपंच व उपसरपंच पदाचा पदभार समारंभ आमदार लंके यांच्या उपस्थितीत झाला. त्यावेळी गाडे यांनी जे वक्तव्य केेले. त्याचे चांगले परिणाम श्रीगोंद्यातील शेलार समर्थकांमध्ये दिसून येत आहे.

गाडे यांच्या प्रयत्नामुळे विधानसभेला  शिवाजी कर्डिले पराभूत झालेले आहेत. तेच शेलार यांना आमदार करण्यासाठी प्रयत्न करणार असल्यामुळे शेलार यांच्या विजयाचा मार्ग सुखर झाला आहे. 

नगर तालुक्याची जबाबदारी गाडे यांनी संभाळली तर आपण श्रीगोंद्याची संभाळून अण्णा यांना विधानसभेत यावेळी पाठवू असा निश्चय कार्यकर्त्यांनी केला आहे. कालपासून श्रीगोंद्यातील शेलार समर्थक कामाला लागल्याचे दिसून  येत आहे.

गाडे यांच्या या वक्तव्याने राष्र्टवादीतील काही इच्छुकांचा चांगलाच हिरमोड झाला आहे. त्यामुळे त्यांना विधान परिषदेचा मार्ग निवडण्याचा सल्ला काहीजण देऊ लागले आहे. त्यांचीही तयारी त्याच दिशेने दिसून येत आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post