गिऱ्हेवाडी शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप...

संगमनेर : स्व. लहानू जोर्वेकर गुरुजींनी आयुष्यभर प्राथमिक शिक्षक म्हणून संगमनेर-अकोले तालुक्यातील विविध शाळेत प्रामाणिकपणे सेवा दिली. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ कुटुंबाने १०० टक्के आदिवासी विद्यार्थी असलेल्या गिऱ्हेवाडी शाळेत शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. शिवछत्रपतींची प्रतिमा असलेले पॅड, कंपास, पाणी बॉटल, अंकलिपी व खाऊ असे प्रत्येकी एक संचाप्रमाणे ६० विद्यार्थ्यांना शनिवार ४ फेब्रुवारी २०२३ रोजी वाटप केले.


साहित्य प्रदान कार्यक्रमात बोलताना पंचायत समिती संगमनेर शिक्षण विभागातील वरिष्ठ लिपिक अरुण जोर्वेकर म्हणाले की, वडिलांनी आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात प्रामाणिकपणे ज्ञानदानाचे कार्य केले. त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ शैक्षणिक साहित्य देताना कुटुंबाला आनंद होत आहे. आई श्रीम.रतनबाई जोर्वेकर व बंधू कृषी सहाय्यक संदीप जोर्वेकर यांचा ही पुढाकार यासाठी महत्वाचा आहे. यानिमित्त संवेदनशीलता जपता आली याचा कुटुंबाला आनंद आहे.

कार्यक्रमाचे प्रास्तविक गिऱ्हेवाडी शाळेतील शिक्षक विजय कांबळे यांनी केले. पदवीधर शिक्षिका सुजाता कातोरे व मारुती पवार यांनी शैक्षणिक साहित्य वाटपा बद्दल जोर्वेकर कुटुंबाचे आभार व्यक्त केले. 

यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका कल्पना कुटे,धोंडीभाऊ पारधी,शा.व्य. समितीचे अध्यक्ष बाळू दुधवडे,माजी अध्यक्ष सोमनाथ भुतांबरे,ग्रामपंचायत सदस्य रामदास गोंदके, सामाजिक कार्यकर्ते निलेश जोशी, सतीश केदार, अंगणवाडी सेविका स्वप्नाली पवार व कु.सिद्धी संदीप जोर्वेकर उपस्थित होते.

या स्तुत्य उपक्रमाबद्दल जोर्वेकर कुटुंबाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील, गटविकास अधिकारी अनिल नागणे गटशिक्षणाधिकारी सुवर्णाताई फटांगरे आदी मान्यवरांनी अभिनंदन केले.

1/Post a Comment/Comments

Post a Comment

Previous Post Next Post