शिर्डी : विरोधी पक्षातील बहुतांश नेते आमच्याकडे येण्यास इच्छुक आहेत. परंतु याचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. सेनेचे आता काय फक्त दहा ते बारा लोक शिल्लक राहिले आहेत, असे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
शिर्डी येथे ते पत्रकरांशी बोलत होते. विखे म्हणाले की, सर्वांनाच आपल्या राजकीय भवितव्यासाठी भाजप हा उत्तम पर्याय वाटत असल्याने शिवसेनाच काय, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे आमदार सुध्दा संपर्कात असल्याचा दावा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला.
विखे पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपल्या भविष्याची चिंता आहे. अनेक राजकीय पक्षांत भवितव्य अंधारात ढकलण्यासारखे झाल्याने लोक पर्याय शोधत असल्याने भाजप सगळ्यांच्या दृष्टीने अतिशय उतम पर्याय आहे.
दरम्यान, नगर जिल्ह्यातील कोण भाजपात जाण्यास इच्छूक आहे का यावर सध्या चर्चा सुरु झाली आहे. परंतु ठोस हालचाली मात्र दिसून येत नाही.
Post a Comment