केंद्राचा निर्णय चांगला...

मुंबई ः माझ्या मते महाराष्ट्राची सुटका झाली. चांगला निर्णय घेण्यात आला. या आधीच हा निर्णय घ्यायला हवा होता. आता घेतला. महाराष्ट्राच्या इतिहासात अशी व्यक्ती राज्यपाल झाली नव्हती. ती झाली. पण केंद्राने निर्णय घेतला ही चांगली बाब आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे अध्यक्ष तथा खासदार शरद पवार यांनी दिली.


राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 
यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत करतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीकाही सोडली आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी संविधानविरोधी निर्णय घेतले होते. त्याची चौकशी झाली पाहिजे का? असा सवाल करण्यात आला. त्यावर, संविधानाच्या विरोधात जे काही झालं असेल त्याची चौकशी व्हावी, असे खासदार शरद पवार म्हणाले.

महापुरुषांचा अवमान करणाऱ्या आणि राज्यघटनेच्या विरोधात काम करून घटनाबाह्य सरकारला शपथ देणाऱ्या महोदयांमुळे राज्यपालपदाची शोभा कमी झाली आहे, असे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा राज्यपाल पदाचा राजीनामा मंजूर झाला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयाचं विरोधकांनी स्वागत करतानाच राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर टीका करण्यात आली आहे.

महाविकास आघाडीची राज्यपाल बदलण्याची मागणी होतीच, म्हणूनच महाराष्ट्रात नवीन राज्यपाल येणार या वृत्ताचे आम्ही स्वागत करतो. नवीन राज्यपाल आधीच्या महोदयांप्रमाणे भाजपच्या हातचे बाहुले बनणार नाहीत, अशी आशा पाटील यांनी व्यक्त केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post