नगर : बारावीच्या पेपरफुटी प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबईच्या पोलीस पथकाने बुधवारी रात्री नगर जिल्ह्यात रुईछत्तीशी या गावात मोठी कारवाई केली आहे. एका मुख्याध्यापकासह पाच जणांना पोलिसांनी अटक केली.
नगर तालुका पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिरीषकुमार देशमुख यांनी या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ही कारवाई केले आहे.
या प्रकरणी किरण संदीप दिघे, अर्चना बाळासाहेब भामरे, भाऊसाहेब लोभाजी अमृते, वैभव संजय तरटे, सचिन दत्तात्रय महारनवर यांना अटक करण्यात आली आहे. प्रश्नपत्रिकेचा फोटो काढून व्हॉट्सअपच्या माध्यमातून पाठवून प्रत्येकी 10 हजार रूपयांना विक्री केल्याचा त्यांच्यावर संशय आहे. तीच प्रश्नपत्रिका दादर येथील परीक्षा केंद्रावर पकडण्यात आल्याने हा प्रकार उजेडात आला.
मुंबईच्या या पथकाने त्यांच्याकडे दाखल गुन्ह्यात तपास करताना नगर जिल्ह्यातील धागेदोरे हाती लागले. त्यानुसार पथक नगर तालुक्यातील रूईछत्तीशी गावात आले. तेथून किरण दिघे, अर्चना भामरे, भाऊसाहेब अमृते, वैभव तरटे, सचिन महारनव यांना ताब्यात घेऊन मुंबईला नेण्यात आले. मुख्याधापकासह दोन शिक्षक, एक चालक आणि शाळा मालकाच्या मुलीला अटक करण्यात आली आहे.
बारावीची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी दादर येथील अँटॉनिओ डिसिल्वा हायस्कूलमधील शिक्षिकेने शिवाजी पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद करण्यात आला. त्याचा तपास सुरु असताना पोलिसांना याचे धागेदोरे नगरच्या रूईछत्तीशी गावातही असल्याचे आढळून आले.
या परीक्षा केंद्रावर प्रश्नपत्रिका आल्यानंतर त्याचे फोटो काढून व्हॉट्सअॅपच्या विद्यार्थ्यांना पाठवण्यात आले. फोडलेल्या या प्रश्नपत्रिकेची प्रत्येकी 10 हजार रुपयांना विक्री करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
बारावी गणित पेपरफुटी प्रकरण नुकतेच राज्यभर गाजले आहे. या प्रकरणात आता नवा ट्विस्ट आला आहे. पेपरफुटी प्रकरणी नगर जिल्ह्यातील रुई छत्तीसी ता. नगर येथील आनंद इंग्लिश विद्यालयातील मुख्याध्यापकांसह पाच जणांना अटक करण्यात आली आहे.
सर्व पेपरफुटीचे प्रकरण गृह विभागाकडून अतिशय गोपनीय पद्धतीने हाताळले जात आहे. बुलडाण्याच्या सिंदखेडराजामध्ये नुकताच बारावी गणिताचा पेपर फुटल्याची घटना समोर आली होती. पेपरच्या दिवशी सकाळी साडेदहापासून सोशल मीडियावर हा पेपर व्हायरल करण्यात आला होता. परीक्षेपूर्वीच अर्धा तास आधीच गणिताच्या पेपरचा हा फोटो व्हायरल झाल्याने खळबळ उडाली होती.
Post a Comment