मुंबई : राज्य सरकारच शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा हप्ता भरेल, अशी घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थमंत्री म्हणून पहिलाच अर्थसंकल्प विधानसभेत सादर केला. या अर्थसंकल्पातून त्यांनी शेतकऱ्यांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. फडणवीस म्हणाले की शेतकऱ्यांना अवघ्या एक रुपयात पीक विमा घेता येणार आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना दर वर्षाला 12 हजार रुपये प्रत्येकी देण्यात येणार आहे.
Post a Comment