नगर : शिक्षकांचे प्रश्न समजावून घेणे ,पाठपुरावा करुन ते योग्य दिशेने सोडवणे यात श्री .भास्कर नरसाळे पारंगत आहेत .अंगीभूत कार्यक्षमता व प्रगल्भतेमुळे त्यांनी शिक्षकांमध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशा युवकांमुळे गुरुकुलच्या भवितव्याची अजिबात काळजी वाटत नाही.
पारनेर तालुक्यातील ढवळपुरी हे त्यांचे गाव. शिक्षणसेवक म्हणून नेवासा तालुक्यात कार्यरत असताना शिक्षकांवर होणाऱ्या अन्याय विरोधात सतत शिक्षक हिता ची भूमिका घेतली. डॉ. संजय कळमकर यांच्या विचाराने प्रेरित होऊन शिक्षण सेवक जिल्हाध्यक्ष पद भूषवले.
सर्वसामान्य शिक्षकांचे शी नाळ जोडली. तालुक्यातील, जिल्हयातील शिक्षकांचे प्रश्न सोडवण्याचे अविरत काम केले. शिक्षक संघटना... मंडळ यांच्या पलीकडे जाउन जिल्ह्यातील खूप मोठा मित्रांचा गोतावळा पाठीशी असल्याने अल्पावधीतच लोकप्रिय ठरले.
नाही हा शब्द त्यांच्या डिक्शनरीत नाही ..कितीही अडचणीच्या प्रसंगातून मदत करण्याची त्यांची भूमिका असते. जिल्हाभर शिक्षकांच्या वैयक्तिक, सांघिक कामांमुळे अतिशय कमी वयात सर्वसामान्य शिक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत.
मिळालेल्या पदाचे संधीचे सोने करत हा अवलिया सातत्याने शिक्षकांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून सोडवणूक करताना दिसतो. कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता विविध सामाजिक उपक्रम सामाजिक बांधिलकी ठेवून गेल्या 15 वर्षापासून सातत्याने शिक्षक हिताचे काम जिल्हाभर सुरू आहे.
अशा या सर्वसामान्य शिक्षकांच्या मनातील शिक्षित नेत्याचा आज वाढदिवस.... त्यानिमित्ताने त्यांना उदंड आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. यापुढील त्यांचे शिक्षकी, संघटनात्मक व राजकिय जीवनासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !
Post a Comment