नगरमध्ये तरुणाला वार...

नगर : शहरातील महेश टॉकीजजवळ  शेख नामक तरुणाला मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. त्याच्यावर धारधार शस्राने वार करण्यात आलेेले आहे.


महेश टॉकीजजवळशेख यास या अनोळखी व्यक्तींनी मारहाण केली. यावेळी त्याच्यावर वार करण्यात आले. त्यानंतर मारहाण करणारे पळून गेले. ही मारहाण कशामुळे झाली, कोणी केली याचे कारण कळाले नाही. 

जखमी तरुणाला उपचारासाठी जिल्हा रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर खासगी रुग्णालयात जखमीला हलविण्यात आले आहे. 


जखमीला जिल्हा रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी जिल्हा रुग्णालयात मोठा जमाव जमला होता. जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने त्याला खासगी रुग्णालयात हलवले. हाच जमाव खासगी रुग्णालयात आला होता. 

या घटनेची माहिती होताच कोतवाली पोलिस घटनास्थळी दाखल झाले.  या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल झालेला नव्हता. या प्रकरणातील आरोपींना तात्काळ अटक करावी अशी मागणी होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post