राहाता : राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याला 1100 रुपये भाव मिळाला. राहाता बाजार समितीत रविवारी कांद्याच्या 3048 गोण्यांची आवक झाली.
कांदा नंबर एकला प्रतिक्विंटल 800 ते 1100 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 2 ला 450 ते 750 रुपये भाव मिळाला. कांदा नंबर 3 ला 200 ते 400 रुपये भाव मिळाला. गोल्टी कांदा 400 ते 600 रुपये भाव मिळाला. जोड कांद्याला 100 ते 200 रुपये भाव मिळाला.
कांद्याला चांगला भाव मिळण्यासाठी शेतकर्यांनी कांद्याची प्रतवारी करून कांदा विक्रीस आणावा असे आवाहन बाजार समितीतर्फे केले जात आहे.
Post a Comment