जमिनीच्या वादातून वृध्दाचा खून...

श्रीगोंदे :  तालुक्यातील बाबूर्डी येथील दशरथ शिर्के या ६० वर्षीय वृद्धाचा जमिनीच्या वादातून झालेल्या भांडणात दोघांनी डोक्यात टणक वस्तूने मारून खून केला आहे. 


या प्रकरणी श्रीरंग शिर्के यांच्या फिर्यादीवरून रामा राजू बरकडे, बिट्या राजू बरकडे (रा.बाबुर्डी) या दोघांविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला.तालुक्यातील शिरसगाव बोडखा येथील शेत गट नंबर २९ मध्ये फिर्यादीच्या नावावर ३ एकर शेती होती. 

त्यापैकी एक एकर जमीन भाऊसाहेब बाबा बरकडे यांना ९० हजार रुपये घेऊन तात्पुरती खरेदी करून दिली होती. ही जमीन फिर्यादीकडे पैसे येतील त्यावेळी पैसे माघारी देऊन त्यांनी घेतलेली जमीन पुन्हा माघारी देणार होते. मात्र,तसे न झाल्याने वाद निर्माण होऊन वृद्धाचा खून करण्यात आला.अधिक तपास पोलीस करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post