तरुणावर गोळीबार...

कर्जत :  कोरेगाव- मुरकुटवाडी (ता. कर्जत) येथील स्थानिक युवकांनी शनिवारी सायंकाळी आतारवस्ती येथील एका तरुणावर गोळीबार केल्याची घटना घडली. 


पोलिसांनी घटनास्थळी भेट देत तपास सुरू केला आहे. जखमीस पुढील उपचारासाठी नगरला हलविण्यात आले आहे. 

मुरकुटवाडी येथे शनिवारी सायंकाळी प्रमोद विजय आतार (वय १९, रा. आतारवस्ती कोरेगाव) याच्यावर काही युवकांनी गोळीबार केला असल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत आतार याच्या पायावर गोळी लागली असल्याचे समजते. 

जखमीला तत्काळ कर्जत उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. ते प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अहमदनगर येथे हलविण्यात आले आहे. घटनास्थळी प्रभारी पोलिस निरीक्षक सतीश गावित भेट देऊन पहाणी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post