सरकारचे शेतकर्यांकडे दुर्लक्ष...

संगमनेर : भाजीपाला, कापूस, सोयाबीन, कांदा या सर्व पिकांचे भाव पडले आहेत. कांदा उत्पादनासाठी खर्च मोठा येत असून यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा वेळेस सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. 


मात्र मेट्रो व स्मार्ट सिटी कडे लक्ष देणाऱ्या या सरकारचे शेतकऱ्यांकडे मात्र दुर्लक्ष आहे. सरकारने शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल कांद्याला जास्तीत जास्त भाव द्यावा. कोणत्याही शेतकऱ्यांची वीज जोड कट करू नये, अशी आग्रही मागणी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

बदलाचे वारे सुरू झाले आहे. 2024 मध्ये संपूर्ण बदल आपल्याला पाहायला मिळेल तसेच जिल्ह्यातही शेतकऱ्यांच्या प्रश्नावर लक्ष देण्याऐवजी काही मंडळी जिरवा जिरवीचे राजकारण करत आहे . हे अत्यंत चुकीचे आहे. 

शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधानसभेतही आपण आवाज उठवू विधानसभेतील आवाज आणि जनतेचा रस्त्यावरील एकत्र मिळून सरकारला चांगले निर्णय घ्यायला भाग पाडू असेही आमदार थोरात यांनी म्हटले आहे.

तर आ डॉ तांबे म्हणाले की, शेतकऱ्यांच्या पिकांना हमीभाव मिळत नाही. शेतकऱ्याची अत्यंत वाईट अवस्था असताना श्रीमंताच्या हिताचे निर्णय भाजप सरकारकडून घेतले जात आहे. कांदा हा नगदी पीक आहे. मात्र कांदा आयातीचे धोरण सरकार घेतले आहे. 

गहू, साखर आयात करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम भाजप सरकार करीत आहे. कांदा हे शाश्वत पीक असल्याने अनेक शेतकरी कांदा उत्पादन करत असतात. ज्यावेळी कांदा उत्पादन जास्त होते त्यावर प्रक्रिया उद्योग सुरू करा. विजेचा धोरण निश्चित करा. दिवसा 12 तास वीज द्या अशी मागणी ही आमदार तांबे यांनी केली

तर यावेळी सौ दुर्गा तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्री थोरात, माधवराव कानवडे ,रामहरी कातोरे ,नवनाथ आरगडे, सिताराम राऊत ,मिलिंद कानवडे, शिवाजी जगताप, निर्मला गुंजाळ, बाबले महाराज, जावेद शेख ,माजी सैनिक रायभान पवार, विष्णुपंत रहाटळ या शेतकऱ्यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

यावेळी सुरेश थोरात, नवनाथ महाराज आंधळे , आनंद वरपे, सुभाष सांगळे ,सौ उगलमुगले ,संतोष हासे, रामदास वाघ ,प्रा बाबा खरात, निखिल पापडेजा ,आदींसह काँग्रेस राष्ट्रवादी व शिवसेनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी कांद्याला हमीभाव द्या, शिंदे सरकारचा निषेध असो अशा विविध घोषणांनी संगमनेर बसस्थानक परिसर दुमदुमून गेला यानंतर शासकीय अधिकाऱ्यांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post