नगर : रस्त्यावर पोपट घेऊन भविष्य सांगणारे भरपूर आहेत. शरद पवारांनी पोपट घेऊन बसणाऱ्याच्या रांगेत बसू नये’, असा टोला महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे.
आगामी २०२४च्या निवडणुकीत बदल होईल, असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे. त्यावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पुण्यातील कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या निकालावरून महाविकास आघाडीमध्ये स्वप्नरंजन सुरू आहे. हे मुंगेरीलाल के हसीन सपने आहेत, अशी टीका विखे पाटील यांनी केली आहे.
Post a Comment