दरोडेखोरांच्या मारहाणीत एकाचा मृत्यू... श्रीगोंदा तालुक्रयातील घटना...

अहमदनगर : श्रीगोंदे तालुक्यातील अरणगाव दुमाला येथे सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला आहे. यावेळी दरोडेखोरांनी केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे.

सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील अरणगाव दुमाला येथील दिवटे वस्ती येथे कल्याण मच्छिंद्र गायकवाड यांच्या राहत्या घरी चोरट्यांनी घरामध्ये प्रवेश केला. त्यामध्ये चोरट्यांनी घरामधील महिलांच्या गळ्यामधील सोन्याचा ऐवज हिसकावला व मारहाण केली. 


घरातील रोख रक्कम लंपास केल्याचे समजते.  तसेच मृत पावलेल्या कल्याण गायकवाड यांनी चोरट्यांना प्रतिकार केला असता चोरट्यांनी डोक्यामध्ये जबर मारहाण केल्यामुळे डोक्यातून रक्तस्राव झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिकाऱ्यांसह श्वानपथक, फॉरेन्सिक लॅब (ठसे तज्ञ) घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहेत.

श्रीगोंदे तालुक्यातील अरणगाव दुमाला येथे सोमवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडा पडला. यावेळी दरोडेखोरांनी संबंधित कुटुंबियांना मारहाण केली. या मारहाणीत एकाचा मृत्यू झाला आहे.


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post