इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री ....

नगर  : देशात धास्ती निर्माण केलेल्या इन्फ्लूएंझा या विषाणूची नगर जिल्ह्यात एन्ट्री झाली आहे. नगरजवळील एका खासगी वैदयकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या 23 वर्षीय तरुणांचा इन्फ्लूएंझा (H3N2) या विषाणूची लागण झाल्याने मृत्यू झाला आहे. 


त्याच्यावर नगर शहरातील एका मोठया रूग्णालयात उपचार सुरू होते. मात्र सोमवारी रात्री साडे दहा वाजता त्याचा मृत्यू झाला. महाराष्ट्रातील हा पहिला बळी असून देशातील तिसरा मृत्यू आहे.

मंगळवारी दुपारी मृत्यू युवकाच्या रक्ताचे नमुने इन्फ्लूएंझा बाधित आले असल्याचा खासगी प्रयोग शाळेचा अहवाल मिळाला आणि नगरच्या आरोग्य विभागात एकच खळबळ उडाली. 

दुसरीकडे मयत तरुणाचा कोविडचा अहवाल पॉझिटीव्ह होता. मयत तरूण मागील आठवड्यात अलिबागला पर्यटनासाठी गेला होता. तेथून नगरला आल्यावर तो आजारी पडला होता.

नगरमधील एका रुग्णालयात त्याला उपचारासाठी दाखल केले होते. त्या वेळी त्याची प्रकृती गंभीर होती. मयत तरुण मुळचा औरंगाबादचा असून तो नगरमध्ये शिक्षण घेत होता. कोविड व इन्फ्लूएंझामुळे मृत्यू झाल्याने नगरच्या आरोग्य खात्यात खळबळ उडाली आहे. 

इन्फ्लूएंझा संसर्ग टाळण्यासाठी पुन्हा कोविड नियमांचे काटेकोर पालन करावे लागणार आहे. दरम्यान मयत तरूणासोबत व संपर्कात आलेल्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post