कांद्याचे भाव घसरल्याने पारनेरकर आक्रमक..... नगर - पुणे रस्ता अडविला...

पारनेर : कांद्याचे भाव घसरल्याने पारनेरचे आमदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर- पुणे महामार्गावर सुपा चौकात रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. राज्यात  कांद्याचे दर अतिशय घसरले आहे. 


कांद्याला मातीमोल भाव मिळत असल्याने संतप्त झालेल्या शेतकरी संतप्त झालेले आहेत. शेतकर्यांनी आमदार लंके यांच्या नेतृत्वाखाली आक्रोश आंदोलन केले.  सरकारने कांद्याच्या निर्यात धोरणामध्ये तातडीने बदल करावे तसेच नाफेड मार्फत कांद्याची खरेदी करण्यात यावी यासह विविध मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. 

शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा प्रश्न असतानाही महसूल प्रशासन आंदोलनाकडे नाही, म्हणून लंके यांनी महसूल प्रशासनाचा निषेध केला. हे सरकार शेतकरी विरोधी असल्याचे लंके म्हणाले. सरकारने यावर योग्य निर्णय घेतला नाही तर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही लंके यांनी यावेळी दिला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post