श्रीरामपूर : जागतिक महिला दिनानिमित्त येथील लोकसेवा विकास महिला आघाडीतर्फे खेळ पैठणीचा तसेच कर्तुत्ववान महिलांचा सन्मान सोहळा आयोजित केला आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार भानुदास मुरकुटे राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सुधा कांकरिया उपस्थित राहणार आहे.
सर्व महिलांना मोफत प्रवेश आहे. या कार्यक्रमात सहभागी व्हा आणि बक्षिसांची लयलूट करा असे आवाहन करण्यात आले आहे.
या स्पर्धेत भरघोस बक्षीसे ठेवण्यात आली आहे. यामध्ये प्रथम, व्दितीय व तृतीय पारितोषिक आकर्षक पैठणी साडी बक्षीस ठेवण्यात आली आहे. खास लकी ड्रॉ पैठणी साडी तसेच तीन भाग्यवान विजेत्यांना चांदीचे करंडे व भाग्यवान विजेत्यांना सोन्याची नथ व इतरही विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मिळवण्याची सुवर्णसंधी आहे.
हा कार्यक्रम उत्सव मंगल कार्यालयात ११ मार्चला सायंकाळी पाच वाजता होणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या कार्यक्रमास उपस्थित राहावे, असे आवाहन लोकसेवा विकास महिला आघाडीच्या अध्यक्ष मंजुश्री सिद्धार्थ मुरकुटे व सचिव पल्लवी रोहन डावखर यांनी केले आहे.
Post a Comment