नाले आणि रस्ते मोकळे करणार .....

नगर : राज्यातील अनेक भागांमध्ये शिवरस्ते ओढे नाले बुजवलेले गेले आहेत त्यामुळे येणाऱ्या काळात हे सर्व खुले करण्यासाठी सरकार मिशन मोडवर जाणार आहे, अशी माहिती  महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांनी दिली.


विखे म्हणाले की, आपल्याकडे बरेच नियम आणि कायदे कालबाह्य झालेले आहेत, त्यामुळे महसूल मध्ये  वर्षानुवर्ष जुन्यास तक्रारी पुढे येत असतात.  विशेषता जमिनीच्या मोजणी प्रकरणांमध्ये सगळ्यात जास्त तक्रारी राज्यात येत आहेत. 

राज्य सरकारच्या स्तरावर सरकारने एक निर्णय घेतला असून रोवर तंत्रज्ञानाचा वापर करून यंत्राच्या साह्याने जमिनी मोजण्यात येणार आहे. सप्टेंबर-ऑक्टोबरपर्यंत राज्यामधील मोजणी पूर्ण होतील. अहमदनगर जिल्ह्याच्या पायलट परिजेक्ट म्हणून ही योजना राबविली जाईल. 

यामध्ये अहमदनगर जिल्ह्यातील मोजणी मार्च-एप्रिल या महिन्यात मोजणी पूर्ण केली जाईल अर्जदाराने अर्ज केल्यास एका महिन्यात त्याला त्याची मोजणी करून नकाशा दिला जाईल. रोरा तंत्रज्ञाने अचूक मोजणी केली जाईल व लवकरात लवकर नकाशे शेतकऱ्याला कसे उपलब्ध होतील हे सरकारचे धोरण आहे, असे ते म्हणाले.

विखे म्हणाले की, महाराज्य स्वाभियान पंजान रस्ते योजनेत जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी तहसीलदार बीडीओ  यांना टाईम बॉण्ड कार्यक्रम दिला आहे.  पावसाळ्यापूर्वी सगळ्या ओढे नाले खोलीकरण रुंदीकरण झालेले असतील असेही ते म्हणाले.

Post a Comment

Previous Post Next Post