एसटीत महिलांना ५० टक्के सूट मिळणार...

मुंबई : सर्व महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सूट मिळणार आहे. राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेत तिकिटदरात महिलांना 50 टक्के सवलत मिळेल अशी घोषणा फडणवीस यांनी केली. 


शिंदे-फडणवीस सरकारचा पहिलाच अर्थसंकल्प आज सादर होत आहे. या अर्थसंकल्पात अनेक मोठ्या घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्या. यात महिलांसाठी अनेक घोषणा करण्यात आल्या आहे.  

याआधी राज्यात ७५ वर्षांवरील नागरिकांना एसटी बसचा प्रवास मोफत करण्यात आला आहे. यानंतर महिलांना ५० टक्के सवलतीचा हा निर्णय मोठा मानला जात आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post