मुंबई : अंगणवाडी सेविका आणि आशा वर्कससाठी तर फडणवीस सरकारने मोठी गुडन्यूज दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर अर्थमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमंडळ अधिवेशनात घोषणांचा पाऊस पाडला आहे. अगदी शेतकऱ्यांपासून ते अंगणवाडी सेविकांपर्यंत आणि महिलांपासून मुलींपर्यंत प्रत्येक वर्गासाठी भरभरून घोषणा केल्या आहेत.
आशा वर्कर व अंगणवाडी सेविकांचे पगार वाढवण्याबाबत घोषणा केली आहे. आशा वर्करचा पगार दीड हजार रुपयांनी वाढवला आहे. अंगणवाडी सेविकांनाही चांगल मानधन मिळणार आहे.
आशा स्वयंसेविकांचे मानधन 3500 वरुन 5000 रुपये गटप्रवर्तकांचे मानधन 4700 वरुन 6200 रुपये, अंगणवाडी सेविकांचे मानधन 8325 वरुन 10,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन 5975 वरुन 7200 रुपये, अंगणवाडी मदतनिसांचे मानधन 4425 वरुन 5500 रुपये.
Post a Comment