मुंबई : ऊस व कांदा या विषयावर संसदेत आवाज उठविणार असल्याचे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी सांगितले.
पवार म्हणाले की, नाफेडकडून खरेदी होत नाही, असा अनुभव आहे. त्यामुळे नाफेडने बाजार समितीत जाऊन खरेदी करावी, त्याचबरोबर कांदा निर्यातही सुरू करावी. राज्यात अलीकडेच झालेल्या अवकाळी पावसामुळेही शेतमालाचे नुकसान झाले असून, अशा बाधित शेतकऱ्यांना मदत दिली पाहिजे, असेही शरद पवार म्हणाले.
कांद्याचा उत्पादन खर्च व विक्रीचे दर यात मोठी तफावत आहे. शेतकऱ्यांचे यात मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. कांद्याला १२०० रुपये भाव मिळायला हवा. राज्य सरकारने शेतकऱ्यांना थेट मदत दिली पाहिजे, असे मत शरद पवार यांनी व्यक्त केले.
Post a Comment