नगर ः शहरासह परिसरात गेल्या काही दिवसांपासून तनावाचे वातावरण निर्माण होत आहे. हे वातावरण निर्माण कोण करते, असा कायम सवाल उपस्थित होत आहे. शहरात नेहमी उदभवणारी तणावग्रस्त परिस्थितीला टाळण्यासाठी शहरात ठिक-ठिकाणी सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे.
यासाठी आता प्रशासनासह लोकप्रतिनिधींनी लक्ष द्यावे, अशी अपेक्षा होत आहे. सीसीटीव्ही बसविण्याच्या फक्त घोषणा करून भागणार नाही तर प्रत्यक्ष सीसीटीव्ही बसविणे गरजेचे आहे. तरच शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यास मदत होईल.
सीसीटीव्ही असल्याने बेशिस्तीला लगाम लागतो. तसेच अनुचित घटना घडल्यानंतर त्या घटनेचा तपास करण्यास मदत होते. त्यामुळे शहरातील मोक्यांच्या ठिकाणी सीसीटीव्ही असणे गरजेचे आहे. यासाठी महापालिका प्रशासनासह पोलिस प्रशासन व लोकप्रतिनिधी यांनी एकत्र येऊन पुढाकार घेणे गरजेचे आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी सर्वांनीच यासाठी आर्थिक नियोजन करणे गरजेचे आहे. मात्र आपल्याकडे एखादी घटना घडल्यानंतरच त्यावर चर्चा होते. त्यावर सीसीटीव्ही बसविण्याचा मुद्दा पुढे येतो.
मात्र त्या घटनेला एक दोन दिवस होऊन गेल्यानंतर परत हा मुद्दा अडगळीला पडतो. हे गेल्या अनेक दिवसांपासून सुरु आहे. त्यावर ठोस असा अद्याप निर्णय झालेला नाही. तो व्हावा, अशी अपेक्षाही व्यक्त केली जात आहे.
शहरात वारंवार होत असलेल्या वादावाच्या घटनांमुळे व्यापारी नेहमीच तणावाखाली वावरताना दिसत आहे. शहरात अनुचित घटना ठिक-ठिकाणी घडत आहेत. या घटनांचा दुष्परिणाम दिसून येत आहे. व्यापाऱ्यांच्या व्यापारावर सध्या खूप परिणाम झालेला दिसून येत आहे. अशा घटनांमुळे ग्रामीण भागातूनही नागरिक खरेदीसाठी येत नाहीत. या घटनांमुळे लहानापासून ते मोठ्या व्यवसायिकांवर मोठा परिणाम होत आहे.
त्यामुळे शहरातील या परिस्थितीवर कायमस्वरुपी उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे. दहशत मुक्त वातावरणात व्यवसाय करण्यासाठी आता पोलिसांनी पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षा व्यापाऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे. यासाठी आता शहरात सीसीटीव्ही बसविण्याचा मुद्दा पुढे येत आहे.
या सीसीटीव्हीच्या माध्यमातून शहरातील चौका-चौकातील घटनांवर लक्ष राहून अनुचित घटना टाळण्यास मदत होणार आहे. यासाठी आता सर्वांनी पुढाकार घ्यवा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
शहराचे आमदार संग्राम जगताप व खासदार डॉ. सुजय विखे यांनी शहरासह परिसरात सीसीटीव्ही बसविण्याची घोषणा केली होती. त्यावर अद्यापकाहीच कामकाज झालेले नाही. त्यांनी जर सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय प्राधान्याने घेतला तर शहरातील अनेक घटनांना लगाम लागण्यास मदत होईल.
शहरासह परिसरात अनेकदा चोऱ्यांच्या घटना घडत आहेत. शहरातील चौकात चौकात सीसीटीव्ही बसविल्यानंतर त्याचा फायदा पोलिसांना तपास करण्यासाठी होणार आहे. त्यामुळे शहरातील चौकाचौकांमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात यावे, अशी मागणी जोरधरत आहे.

Post a Comment